Apang Gharkul Yojana | अपंगांसाठी घरकुल योजना

अपंगांसाठी घरकुल बनवण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केली. त्या अंतर्गत ८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकार घर बांधून देणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी या घोषणेचे स्वागत केले आहे. मात्र, घरकुल देताना दिव्यांगत्वाची टक्केवारी कशासाठी, असा सवालही उपस्थित केला असून, या योजनेचे लाभ देताना स्वतःची जागा, उत्पन्न, जात असे कोणतेही निकष लावू नये, अशी मागणी केली आहे.

दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना शासनातर्फे घरकुल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सातत्याने विविध संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन सरकारने दिव्यांगांसाठी घरकुल बांधण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केली आहे. ही भरीव तरतूद स्वागतार्ह असल्याचे अपंग हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष हरिदास शिंदे यांनी म्हटले आहे. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनांमध्ये दिव्यांगांना स्वतःची जागा, उत्पन्न, जातीचे निकष लावले जात होते. मात्र, बहुतांश दिव्यांगांकडे स्वतःची जागा नसते. त्यामुळे दिव्यांगांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास अडचणी येत होत्या. आताही दिव्यांगाच्या घरकुलासाठी सरकारने केलेल्या तरतुदींमधून दिव्यांगांना जागेसोबत बांधकामासाठीही अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात यावे आणि अन्य कोणत्याही अटी लावू नयेत, असेही त्यांनी नमूद केले.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment